राष्ट्रवादीला मोठा धक्का, अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल!

राष्ट्रवादीला मोठा धक्का, अजित पवारांविरोधात गुन्हा दाखल!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रावादी यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार चर्चेत आला होता. राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. संचालक मंडळाने नियमांचं उल्लंघन केल्याने बँकेला फटका बसला होता. त्यामुळे या घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारे यांनी तीन वर्षांआधीच याचिका दाखल केली होती.

याप्रकरणी चौकशी समिती देखील नेमण्यात आलेली होती. चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर कोर्टाने याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. तब्बल ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता अजित पवारांवर गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS