राष्ट्रवादीचे पाच उमेदवार जाहीर, शरद पवारांनी केली घोषणा!

राष्ट्रवादीचे पाच उमेदवार जाहीर, शरद पवारांनी केली घोषणा!

बीड – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
बीडमधून संदीप क्षीरसागर,गेवराईतून विजयसिंह पंडित,माजलगावमधून प्रकाश सोळंके,केजमधून नमिता मुंदडा,तर परळीमधून धनंजय मुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. पवार आज बीडच्या दौय्रावर आहे. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे.

दरम्यान शरद पवारांनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा विजय झाला होता. यामुळे यावेळी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात बहिण-भावाचा सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीडमधील परळी मतदारसंघ चांगलाच गाजणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS