जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख होम क्वारंटाइन, पत्नीला कोरोनाची लागण !

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख होम क्वारंटाइन, पत्नीला कोरोनाची लागण !

मुंबई – शिवसेना नेते आणि राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे स्वत: हून होम क्वारंटाइन झाले आहेत. शंकरराव गडाख यांची पत्नी सुनिता गडाख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. गडाख यांचं गाव असलेले नेवासे तालुक्यातील सोनई येथे एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सोनईसह परिसर सील करण्यात आला होता. स्वत: शंकरराव गडाख, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी गावात विशेष पथके तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान सोनई गावात एकाच कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाल्यानं संपूर्ण गाव सध्या 14 दिवसांसाठी हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गावाकडे येणारे सर्व रस्ते सील करण्यात आले असून काही दिवसांपूर्वी मंत्री शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाययोजनांचा आढावा घेतला होता. परंतु अशातच शंकरराव गडाख यांची पत्नी सुनिता गडाख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. गडाख यांचाही स्वॅब तपासणीसाठी पाठवला असून त्याचा अहवाल येणं बाकी आहे.

COMMENTS