हायप्रोफाईल सेक्स रॅकेट – एफआयआरमध्ये तीन आमदार आणि बड्या अधिका-यांची नावे !

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट – एफआयआरमध्ये तीन आमदार आणि बड्या अधिका-यांची नावे !

आसाममध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. त्या सेक्स रॅकेटच्या एआआयआरमध्ये तीन आमदारांचा आणि काही बड्या अधिका-यांचा समावेश आहे. तीन आमदारांमध्ये दोन आमदार भाजपचे तर एक आमदार एआययूडीएफचा आहे. भाजपचे आमदार अनिनुल हक लस्कर आणि किशोर नाथ यांचं नाव एफआयआरमध्ये आहे. तर एआययूडीएफचे आमदार निजामुद्दीन चौधरी यांचंही नाव आहे. या प्रकरणी पोलीसांनी पुढचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे आसमाच्या राजकारणामध्ये प्रचंड वादळ उठलं आहे. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलं आहे.

या हायप्रोफाईल सेक्स रॅकेट प्रकरणी परवा पोलासांनी एका महिलेला अटक केली आहे. ती महिला हे सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे. तर दोन महिला या कथीत सेक्स रॅकेटमधून स्वतःची सुटका करुन घेतली. त्यांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केलं आहे. मेहरपूर भागातील पुष्प विहार लेनमधील एका घरामध्ये हे सेक्स रॅकेट चालत असल्याचा आरोप त्या दोन महिलांनी केला आहे. त्या दोन महिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तीन आमदारांसोबत, महापालिकेचा आयुक्त, अनेक बडे अधिकारी आणि काही वकिलांचा समावेश आहे. एफआयआरमध्ये आमदरांचा आरोपीच्या ऐवजी ग्राहक म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. तीनही आमदारांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

COMMENTS