ज्याने निवडणुकीत पराभूत केले त्याचाच प्रचार करण्याची वेळ – सत्यजित तांबे

ज्याने निवडणुकीत पराभूत केले त्याचाच प्रचार करण्याची वेळ – सत्यजित तांबे

पुणे –  ज्याने मला पराभूत केले आता त्याचाच प्रचार करायची वेळ माझ्यावर आली असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी केलं आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विरुद्ध काँग्रेसचे सत्यजित तांबे असा सामना झाला होता. त्यामुळे तांबे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

तसेच ज्यांच्या विरोधात मी विधानसभा लढलो आता त्यांचा प्रचार करणं माझ्या जीवावर आले आले आहे, मात्र तरीही आपण आघाडीचा धर्म पाळणार असून, काहीही करून जगताप यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं तांबे यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पुण्यात मेळावा पार पडला. यावेळी तांबे बोलत होते.

COMMENTS