युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबेंचा थेट महाविकास आघाडीला सवाल, ‘ती’ योजना महाविकास आघाडी सरकारची, की शिवसेना-राष्ट्रवादीची?

युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबेंचा थेट महाविकास आघाडीला सवाल, ‘ती’ योजना महाविकास आघाडी सरकारची, की शिवसेना-राष्ट्रवादीची?

मुंबई – युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी थेट महाविकास आघाडीला प्रश्न केल्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील नाराजी समोर आली आहे. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत  केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, सत्यजीत तांबे यांनी सवाल उपस्थित केला आहे. “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी का होत नाही”, असं ट्वीट सत्यजीत तांबे यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा समोर आले आहेत.

दरम्यान महाविकास आघाडी सरकार असताना, महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवर केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नेत्यांचे फोटो आहेत. यामध्ये काँग्रेस नेत्याचा फोटो नाही. सत्यजीत तांबे यांनी जे ट्वीट केलं आहे, त्या जाहिरातीवर केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे फोटो आहेत.  हे सर्व त्या विभागांशी संबंधित मंत्री आहेत. त्यामुळे तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सत्यजित तांबे यांचे ट्वीट

#महा_जाॅब्स् ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची ?
आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे.

 

COMMENTS