ब्रेकिंग न्यूज – साताय्रात उदयनराजे पिछाडीवर, राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आघाडीवर !

ब्रेकिंग न्यूज – साताय्रात उदयनराजे पिछाडीवर, राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आघाडीवर !

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीची पहिली फेरी पार पडली आहे. या मतमोजणीनंतर निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु मतमोजणीदरम्यान काही दिग्गज नेते आघाडीवर आहेत. तर काही पिछाडीवर आहेत. पिछाडीवरील नेते मागेच राहिले तर त्यांची हार होऊ शकते. महाराष्ट्रात 288 जागांपैकी काही महत्त्वाच्या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परळी, बारामती, सातारा, वरळी, शिर्डी, येवला, लातूर, भोकर, या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

उदयनराजे पिछाडीवर

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजरचे उमेदवार उदयनराजे भोसले हे 1089 मतांनी पिछाडीवर आहेत. तर याठीकाणी राष्ट्रवादीचे उेदवार श्रीनिवास पाटील हे आघाडीवर आहेत.

राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार आघाडीवर

बारामतीत राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांना पहिल्या फेरीत 7467 तर तर भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना आतापर्यंत अवघे 872 मतं पडली आहेत. त्यामुळे पडळकर यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

COMMENTS