वर्षपूर्तीनंतर दोघांची कमराबंद चर्चा

वर्षपूर्तीनंतर दोघांची कमराबंद चर्चा

मुंबई – राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एक वर्षापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी महाविकास आघाडीची स्थापना करून सरकार स्थापन केले. सरकारच्या वर्ष पूर्तीनंतर खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सुमारे तासभऱ कमराबंद चर्चा केली. या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुटल चर्चा सुरू आहे.

महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातला प्रयोग हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्त्वाचा प्रयोग आहे. या प्रयोगाकडे कायमच राजकारणातील एक वेगळा बदल म्हणून पाहिलं जाईल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची मोट बांधण्यात ज्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली ते दोन महत्त्वाचे नेते म्हणजे संजय राऊत आणि शरद पवार. या दोघांनी घेतलेल्या पुढाकारानंतर काय घडलं ते महाराष्ट्राने पाहिलंच आहे. दरम्यान आज शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या बंगल्यावर जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.

भेटीनंतर संजय राऊत म्हणाले की, “आदरणीय शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील राजकीय परिवर्तनात त्यांचं योगदान मोलाचं आहे. त्यांचा कामाचा उरक आणि उत्साह थक्क करणारा आहे. संकट आणि असंख्य वादळांमध्ये त्यांचे नेतृत्त्व खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. नक्कीच आणि निश्चित” अशी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी भेटीनंतर ट्विट केलं आहे.

 

COMMENTS