तेलगू देशमनं शिवसेनेकडूनच प्रेरणा घेतली –संजय राऊत

तेलगू देशमनं शिवसेनेकडूनच प्रेरणा घेतली –संजय राऊत

 मुंबई  तेलगू देशम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू यांनी यांनी काल एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. तसेच या घोषणेनंतर त्यांनी केंद्रातील त्यांच्या दोन मंत्र्यांना राजीनामे देण्याचे आदेशही दिले होते. चंद्रबाबू नायडू यांनी शिवसेनेकडूनच प्रेरणा घेतली असल्याचा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेकडून प्रेरणा घेऊनच ते एनडीएतून बाहेर पडले असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेचाही झाला असून तो योग्य वेळ येताच जाहीर केलं जाईल असंही राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची आठवणही राऊत यानिमित्तानं करून दिली आहे. तसेच गुळाच्या ढेपेला चिकटलेले आणखी काही मुंगळे तिथून निघण्याच्या तयारीत असल्याचा गोप्यस्फोटही राऊत यांनी यावेळी बोलत असताना केला आहे.

 

COMMENTS