मातीच्या ढिगा-याखाली 24 तारखेला कुणाला तरी गाडायचंय, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा !

मातीच्या ढिगा-याखाली 24 तारखेला कुणाला तरी गाडायचंय, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा !

मुंबई – मातीच्या ढिगा-याखाली 24 तारखेला कुणाला तरी गाडायचं आहे. शिवसेना औषधालाही राहणार नाही अशी भाषा केली ते शिवसेनेशी जुळवून घेण्याची भाषा करतायत हा काळाने उगवलेला सूड आहे.आपण न्यायप्रिय मुख्यमंत्री आहात आपण कायद्याचे राज्य चालवता आपण अनेकांना धडा शिकवण्याची भाषा केली स्वतःच्या पक्षातील आणि बाहेरच्याही या मुख्यमंत्र्यांनी रमेश गोवेकरांच्या प्रकारणाचा छडा लावावा आणि युती धर्माची भाषा करावी असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

इथे सांडलेल्या शिवसैनिकांच्या रक्ताचा बदला घेण्याची ही लढाई आहे. अयोध्येची सुनावणी आज संपली. 40 दिवस सुनावणी सुरू होती. आदित्यनाथ म्हणाले या दिवाळीला सगळ्यात मोठा दीपोत्सव साजरा करणार. आम्ही कणकवलीत दीपोत्सव साजरा करू इथे कमळ फुलवणार असं मुख्यमंत्र्यांच्या समोर सांगितले. इथे कमळ कसली फुलवताय इथे भात येतो, काजू येतो असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांना खूप व्याप असतो त्यामुळे कधी कधी काही गोष्टींचे विस्मरण होत असेल. विधिमंडळात नारायण राणेंनी माहितीपूर्ण भाषण केले होते. भाजपा हा गुंड, दहशतवाद्यांचा पक्ष आहे. राज्यातील सर्व गुंड आणि दरोडेखोर या पक्षात प्रवेश घेतायत. राणे म्हणाले होते एक दिवस दा़ऊदही भाजपात प्रवेश घेईल. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिलं की कणकवलीत खूनापासून ते जमिनी बळकावण्यापर्यंत कु़णावर गुन्हे आहेत. मग आता चरित्र कुणाचं बदललं प्रवेश देणा-याचं की घेणा-याचं असा सवालही राऊत यांनी केला आहे.

COMMENTS