त्यानुसार अजित पवारांनी पाठिंब्याचे वक्तव्य केलं आहे – संजय राऊत 

त्यानुसार अजित पवारांनी पाठिंब्याचे वक्तव्य केलं आहे – संजय राऊत 

मुंबई – प्रत्येक जण आपला आपला नेता निवडतोय, आम्हीही उद्या नेता निवडत आहाेत.  सध्याच्या राजकीय परिस्थितीत अशी वक्तव्ये करावी लागतात, त्यानुसार अजित पवारांनी पाठिंब्याचे वक्तव्य केलं असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच भाजपचा कोणता फॉर्म्युला आहे, यासाठी आम्ही काही नोंदवही घेऊन बसलेलाे नाही. फॉर्म्युला कोणता आला असेल तर ती एक पुडी आहे. उद्धव ठाकरे जे जे आदेश देतील ते ते आम्ही मान्य करू असंही राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान महाराष्ट्राची कुंडली शिवसेना ठरवणार आहे. कुठे कोणते ग्रह ठेवायचे हे आमच्या हातात आहे. आम्ही सोबत राहण्यात महाराष्ट्राचं हित आहे. तसेच शिवेंसेनेचा कुठलाही आमदार फुटणार नाही.शिवसेनेचे 23 आमदार जर भाजपच्या संपर्कात आहेत तर तुम्ही फक्त आकडे बांधा
जोपर्यंत लिखित स्वरूपात प्रस्ताव भाजपकडून येत नाही तोपर्यंत शिवसेनेची भूमिका आमच्याकडून स्पष्ट होणार नाही. स्थिर सरकार होण्यासाठी जे ठरलंय ते तसच व्हायला हवं त्यात मुख्यमंत्री पदसुद्धा असं स्पष्टीकरणही राऊत यांनी दिलं आहे.

COMMENTS