मी उत्तम मारामाऱ्या करायचो म्हणून बाळासाहेबांनी मला जवळ केलं!, पत्रकारिता ते राजकारण, वाचा संजय राऊत यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे!

मी उत्तम मारामाऱ्या करायचो म्हणून बाळासाहेबांनी मला जवळ केलं!, पत्रकारिता ते राजकारण, वाचा संजय राऊत यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे!

पुणे – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुलाखत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी आज पुणे येथे घेतली. यावेळी संजय राऊत यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. मुलाखतीच्या सुरुवातीलाच राऊत यांनी देशात असे कुठे दिसत नाही, एक वृत्तपत्र दुसऱ्या वृत्तपत्राच्या संपादकाला मुलाखतीसाठी बोलावतात.अजूनही मला स्वतःला पत्रकार म्हणूनच म्हणवून घ्यायला आवडतं. मला जे मिळालं ते पत्रकारितेमुळे मिळालं. मी सामना संपादक आहे याचा मला आनंद असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान रोज सकाळी लोकांनी सामना उघडला नाही तरी रोज सकाळी तो टिव्हीवर दिसतो, हे भाग्य कुणाला मिळतं?, राजेश खन्ना आणि राज कुमार यांची खास शैली होती. ते मला आवडायचे. म्हणून मी माझी शैली बनवली. तुमची हिम्मत एकदा बघितली समोरच्या माणसाने की मग तो प्रधानमंत्री असू द्या, गृहमंत्री असू द्या काही फरक पडत नाही. मी कोणत्याही दबावाखाली काम करत नाही. मी शिकलोच नाही, मी उत्तम मारामाऱ्या करत करत होतो म्हणून बाळासाहेबांनी मला जवळ केल. आता त्या मारामाऱ्या ना चळवळी म्हणतात. जे एन यू मध्ये जे घडतं ती चळवळ असंही राऊत म्हणाले.

तसेच खलनायक हा समाजाचा भाग असतो.आमच्या आसपास बरेच खलनायक असतात. आमच्या पक्षात खलनायक असण्याचे कारण नाही. काही लोकांना असं वाटतं संजय राऊत यांच्यामुळे आपली सरकार बनवण्याची संधी गेली.पण झालं गेलं विसरायचं असतं. एकेकाळी मुंबईचं अंडरवर्ल्ड शिकागो क्या अंडरवर्ल्ड पेक्षा भयानक होतं, आता काही राहिलं नाही. मी पुस्तकी झालो नाही, हा बाळासाहेबांचा प्रभाव होता.हे सरकार म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी नाही. ते नीट जन्माला घातलेलं बाळ आहे.

सरकार बनल, हे कुणाच्या कचाट्यात सापडल्यानं नाही. शरद पवारांनी ते घडवून आणलं. माझ्यासाठी उद्धव ,राज सोडून द्या, बाळासाहेब महत्वाचे होते. मी राज ठाकरे सोबत जाणार या केवळ टिव्ही वरच्या बातम्या होत्या. शरद पवार यांच्यावर माझी प्रचंड श्रद्धा आणि विश्वास आहे. बाळासाहेब आणि शरद पवार यांचा महाराष्ट्रावर पगडा राहिला. या सरकारला कोणी खिचडी म्हणत नाही. शरद पवार पाठिशी उभे राहिल्याने हे सरकार बनलं, त्याचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत.

फारतर निकाल लागण्यासाठी ठरलं असं म्हणता येईल. हे नंतर गडबड करणार हे माहीत होत म्हणून असं घडलं. लोकसभा निकालानंतर हे भाजप गडबड करणार याची खात्री होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे काय पाकिस्तानातील पक्ष आहेत का , नरेंद्र मोदींनी सांगितलं का? असा सवालही राऊत यांनी केला आहे.

COMMENTS