बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला संजय राऊतांची गैरहजेरी, त्यामुळे गैरहजर राहिल्याची चर्चा !

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला संजय राऊतांची गैरहजेरी, त्यामुळे गैरहजर राहिल्याची चर्चा !

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या गणेशपूजनाचा कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला महापौर बंगल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजपा नेत्या पुनम महाजन, मुंबईचे महापौर महाडेश्वर, केंद्रीय मंत्री अनंत गिते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, मनोहर जोशी, शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे, आणि ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत मात्र अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये बंददाराआड चर्चा झाली असल्याची माहिती आहे. चर्चेवेळी इतर सर्वजण बाहेरच थांबले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये युती करण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

त्यामुळे संजय राऊतांची उनुपस्थिती

दरम्यान युतीबाबत राऊत यांनी वारंवार वादग्रस्त विधान केली होती. भाजपवर त्यांनी जोरदार टीकाही केली आहे. त्यामुळेच त्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं असल्याची चर्चा रंगली आहे.

 

COMMENTS