संजय राठोड पोहरादेवी दर्शनासाठी रवाना

संजय राठोड पोहरादेवी दर्शनासाठी रवाना

यवतमाळ : सोशल मिडिया स्टार पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील घरी दाखल झाले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून ते माध्यमांसमोर आले नव्हते. थोड्याच वेळात ते यवतमाळ येथून वाशिममधल्या पोहरादेवी दर्शनासाठी रवाना होणार आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी अडचणीत सापडलेले संजय राठोड आज मौन सोडणार का? या प्रकरणावर ते नेमकं काय बोलणार, काय भूमिका मांडणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनाला जात आहेत. संजय राठोड यवतमाळ इथल्या निवासस्थानवरुन सकाळी 10.50 वाजता वाशिममधील पोहरादेवी मंदिराकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोडही होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली आहे.

COMMENTS