टीआरपी घोटाळा झालेल्या चॅनेल्सचा उपयोग भाजपसाठी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा मोठा आरोप! पाहा

टीआरपी घोटाळा झालेल्या चॅनेल्सचा उपयोग भाजपसाठी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा मोठा आरोप! पाहा

मुंबई – भारतीय टीव्ही क्षेत्रात एक घोटाळा उघड झाला आहे. मुंबई पोलिसांनी टीव्ही क्षेत्रातील टीआरपी वाढविण्याचा घोटाळा उघड केला असून याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली आहे. चॅनलचे टीआरपी वाढविण्यासाठी एक रॅकेट कार्यरत होते. यासाठी घराघरात विशिष्ठ चॅनल सुरू ठेवण्यासाठी पैसे दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनलच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. तर रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीचे नाव यात समोर आले असून त्यांनी आपल्या चॅनलची टीआरपी वाढवण्यासाठी पैसे दिल्याची माहिती आहे. या प्रकरणात सबळ पुरावे हाती येताच रिपब्लिक टीव्ही चॅनलच्या संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं परमबीर सिंग म्हणाले आहेत.

या घोटाळ्यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फेक TRP च्या माध्यमातून एका अप्रचाराची दिशा ठरवण्याची भूमिका हे सुशांत सिंग प्रकरणात घेतली गेली. ज्या मीडियाला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानण्यात येतो तोच जर असा विकृत मनोवृत्तीचा असेल तर प्रामाणिकपणाने काम करणारे देखील संशयाच्या घे-यात येतात. तसेच ‘या’ चॅनेल्सचा उपयोग भाजपसाठी झालेला झाला असल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे.

COMMENTS