संजय राऊत म्हणतात टोपीवाल्यानं टोपी टाकली की सर्व माकडं टोप्या टाकतात, तर सचिन सावंत म्हणतात…

संजय राऊत म्हणतात टोपीवाल्यानं टोपी टाकली की सर्व माकडं टोप्या टाकतात, तर सचिन सावंत म्हणतात…

मुंबई – टोपीवाला आणि माकडाच्या गोष्टीचं उदाहरण देत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं दिसत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काल ट्विटरवरून काँग्रेवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी माकडं आणि टोपीवाल्याच्या गोष्टीचा अप्रत्यक्षरित्या काँग्रेसशी संदर्भ जोडत त्यांची खिल्ली उडवली होती. टोपीवाल्याने टोपी खाली टाकल्यावर सगळ्या माकडांनी टोपी खाली टाकून दिली. याचा काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्याशी काही संबंध नसल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या राहुल गांधी आणि अन्य नेत्यांच्या सुरू असलेल्या राजीनामासत्रावर टीका केली होती.

यावर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.टोपीवाला टोपी खाली टाकीन असे म्हणत राहीला पण टाकलीच नाही, त्यामुळे सगळी माकडं आपल्या जवळच्या टोप्या पकडून राहीली. टोप्या टाकायला तयारच होईना. याचा शिवसेना मंत्र्यांच्या खिशाबाहेर न येणाऱ्या राजीनाम्यांशी काही संबंध नसल्याचं ट्विट करत सावंत यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

COMMENTS