तेंव्हा रेल्वे अधिकाऱ्यांनी हात वर केले,  त्यांच्यावर वरुन दबाव आहे का? – सचिन सावंत

तेंव्हा रेल्वे अधिकाऱ्यांनी हात वर केले, त्यांच्यावर वरुन दबाव आहे का? – सचिन सावंत

मुंबई – नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून महिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा असावी असा राज्य सरकारचा प्रयत्न होता. यासाठी राज्य सरकार, महापालिका व रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय आधीच झाला होता. याबाबत रेल्वेबरोबर चार बैठका झाल्या. 13 तारखेला चार तास बैठक झाली मात्र जेव्हा राज्याने महिलांना प्रवासास मुभा देणारे पत्र दिलं आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी हात वर केले असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे. रेल्वे अधिकार्‍यांवर वरून दबाव आहे का?, कोविड 19 प्रोटोकॉल आधीच ठरवला आहे, मग रेल्वे महिलांना लोकलने प्रवास करायला मुभा द्यायला का तयार नाही यात भाजपचे राजकारण आहे असून रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर द्यावे त्यांची इच्छा नाहीये का? असा सवाल करत यात राजकारण करू नका असा इशाराही सावंत यांनी दिला आहे.

दरम्यान मुंबईसह एमएमआर भागातील महिलांना नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून लोकल प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. असं असताना रेल्वेकडून मात्र आता वेळकाढूपणा केला जात आहे. स्वतःच्या अधिकारात निर्णय घेता येत असतानाही जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. १७ तारखेपासून हा प्रवास महिलांना करता येणार होता व त्याच दिवसापासून नवरात्र सुरू होणार हे माहित असताना रेल्वेबोर्डाची परवानगी आधीच का घेतली नाही? याचे उत्तर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईच्या महिलांना दिले पाहिजे असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS