पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा पाठिंबा, म्हणाले…

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा पाठिंबा, म्हणाले…

मुंबई – राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे. दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. ‘दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं असं ट्वीट करत रोहित पवार यांनी राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो असं म्हटलं आहे.

दरम्यान रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मला तुमचे 9 मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून 9 मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा. कोरोनाग्रस्त बांधवांना आपल्याला प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. त्यासाठी या प्रकाशाची ताकद दाखवायची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच यासाठी कोणालाही कुठेही एकत्र जमायचं नाही, रस्ते, गल्ली इथे जायचं नाही, सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पार करु नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

या अवाहनावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली आहे. लोकांची चूल कशी पेटेल, यावर साहेब बोलतील, असं वाटलं होतं, मात्र त्यांनी दिवा पेटवण्याचा संदेश दिला असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. तर मोदी फक्त इव्हेंट करण्यात पटाईत आहेत, वाटलं होतं लोकांची चूल पेटवण्यासंदर्भात बोलतील, परंतु साहेब दिवा पेटवण्याचा संदेश देऊन गेले. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

परंतु राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला पाठिंबा दर्शवला आहे.

COMMENTS