राणेंचा इतिहास हा रक्तरंजित – विनायक राऊत

राणेंचा इतिहास हा रक्तरंजित – विनायक राऊत

रत्नागिरी : खासदार नारायण राणे यांचा इतिहास हा रक्तरंजित आहे. राणेंच्या भावाचे मारेकरी शोधले जातील. या खुनामागे कोण आहे हे सिंधुदुर्गातील जनता जाणत असल्याची टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली. त्याचं निमित्ताने भाजपच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली होती. हे सरकार गद्दीरीनं आलं असून ते निक्कमं आहे. त्त्याला उत्तर देत असताना राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांच्यावर यांनी टीका केली.
राऊत म्हणाले, नारायण राणे यांनी मिटक्या मारत बसावे. त्यांना सत्ता काही मिळणार नाही. गद्दारीवर नारायण राणे यांनी बोलू नये. बेईमानी आणि गद्दारी म्हणजे राणे असे समीकरण आहे. शिवसेना, काँग्रेससोबत राणेंनी काय केलं हे सर्वांना माहित असल्याचं देखील यावेळी राऊत म्हणाले.

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील विनायक राऊत यांनी थेट निशाणा साधला. राऊत म्हणाले, शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करणार. पण, देवेंद्र फडणवीस हे सत्तापिसासू आहेत. त्यांना सध्या केंद्राच्या नेतृत्वानं सत्तेपासून बाहेर ठेवलं आहे. त्यांचा दिल्लीवर स्वारी करण्याचा डाव केंद्रीय नेतृत्वाच्या लक्षात आला म्हणून अशा प्रकारे त्यांना सत्तेपासून लांब ठेवल्याचे म्हटलं आहे.

COMMENTS