राष्ट्रवादीला धक्का, रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित !

राष्ट्रवादीला धक्का, रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का बसला असून रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. उद्या दुपारी ते मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. परंतु त्यांचे वडील आणि राष्ट्रवादीचे ज्यष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील मात्र पक्ष सोडणार नसल्याची माहिती आहे.

दरम्यान लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. विजयसिंह मोहिते-पाटलांनी आज अकलूजमध्ये महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीला मोहिते पाटील समर्थक उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली आहे.

COMMENTS