रणजितसिंह मोहिते पाटलांबरोबर ‘या’ नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश !

रणजितसिंह मोहिते पाटलांबरोबर ‘या’ नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश !

मुंबई – रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील (चुलतभाऊ ) माळशिरस पंचायतमधील वैष्णोदेवी मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान विधानपरिषदमध्ये सदस्य असल्यापासून भाजपबरोबर आपुलकीचे नातं निर्माण झालं होतं. मुख्यमंत्र्यांनी राज्य प्रगतीपथावर नेले, सर्व गटतट बाजूला ठेवत सर्वांची कामे केली असल्याचं रणजितसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच आवर्जून सांगायचे आहे की गडकरी यांच्यामुळे रस्त्यांची कामे झाली. राष्ट्रवादीचे असून कामे कशी होतात अशी टीका करण्यात येत होती. माढा, सोलापूरमधील विविध प्रश्न सोडवले. रेल्वेचा प्रश्न सोडवला. पासपोर्ट कार्यालयचा प्रश्न सोडवला.सिंचन प्रश्न सोडवले. कृष्णा खोरे स्थिरीकरण योजना असा एक प्रकल्प विजयसिंह मोहिते पाटील मांडला मात्र राष्ट्रवादीच्या काळात न्याय देता आला नसल्याचं रणजितसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच राजकारण हे शेवटच्या माणसाला लाभ देणारे असले पाहिजे. आम्हाला तुमच्याबरोबर काम करायची संधी दिलीत, तुम्ही सांगाल ते पुढे राजकारण, समाजकारण करू असंही यावेळी रणजितसिॆह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS