राष्ट्रवादीला धक्का, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपाच्या वाटेवर ?

राष्ट्रवादीला धक्का, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपाच्या वाटेवर ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत नाराज असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माढ्यातून पवारांनी माघार घेतल्यानंतर तिथे रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याची विजयसिंह मोहिते पाटील यांनी मागणी केली आहे. परंतु राष्ट्रवादी रणजितसिंह यांना उमेदवारी द्यायला तयार नसल्याची माहिती आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे रणजितसिंह मोहिते पाटील नाराज पक्षावर नाराज असून ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. रणजितसिंह मोहीते पाटील भाजपाच्या संपर्कात असून गिरीश महाजन यांची त्यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे रणजितसिंह यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.

COMMENTS