कोकणात नारायण राणे आणि राष्ट्रवादीमध्ये होणार आघाडी ?

कोकणात नारायण राणे आणि राष्ट्रवादीमध्ये होणार आघाडी ?

मुंबई – आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना सोबत घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची मदत घेणार असल्या असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बैठक पार पडली होती.यात राष्ट्रवादीने सिंधुदुर्गची जागा सोडण्याची मागणी काँग्रेसकडे केली होती. तसेच सिंधुदुर्गमध्ये आमच्याकडे मोठा उमेदवार आहे असं राष्ट्रवादीने जाहीर केलं होतं. हा मोठा उमेदवार नारायण राणेच असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी रायगडची एक जागा सुनील तटकरेंसाठी सोडली जाणार आहे. तर सिंधुदुर्गातून नारायण राणे यांच्या पक्षाला जागा देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. कारण सुनील तटकरे आणि नारायण राणे यांना रायगड आणि सुधुदुर्गमध्ये एकमेकांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षासोबत युती करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु काँग्रेसने याबद्दल अजून होकार दिलेला नसल्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS