लोकसभा निवडणूक LIVE :  युतीसाठी रामटेकची जागा अवघड, आघाडीकडून तगडं आव्हान!

लोकसभा निवडणूक LIVE : युतीसाठी रामटेकची जागा अवघड, आघाडीकडून तगडं आव्हान!

नागपूर – विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. यामध्ये नागपुरातील रामटेक लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.  या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाणे हे पुन्हा एकदा युतीकडून रामटेकमधून लढत आहेत. आतापर्यंत तुमाणे यांना ही निवडणूक सोपी होती परंतु आता आघाडीनं तगडा उमेदवार उभा केल्यामुळे युतीसाठी ही निवडणूक अवघड जाणार असल्याचं बोललं जात आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून किशोर गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीकडून किरण रोडगे-पाटणकर रिंगणात आहेत. त्यामुळे तुमाणे यांच्यासमोर या दोन्ही उमेदवारांचं मोठं आव्हान आहे.

दरम्यान रामटेकमध्ये एकूण 16 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांपैकी युतीपुढे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं तगडं आव्हान आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात जवळपास 9 लाख मतदार आहेत. त्यामुळे हे मतदार पुन्हा युतीलाच कौल देणार का याबाबतचं चित्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

COMMENTS