आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील – रामदास आठवले

आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील – रामदास आठवले

पिंपरी चिंचवड – गुजरात आणि राजस्थानमधील निवडणुकीमध्ये भाजपची घसरण पहावयास मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील, असं भाकित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे. तसेच भाजप 250 जागा मिळवून केंद्रात सत्ता स्थापन करील असंही आठवले यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.

दरम्यान आगामी निवडणुकीत शिवसेनेनं स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. याबाबत बोलत असताना आठवले यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे आज एक बोलले, तरी उद्या दुसरं बोलतात. त्यामुळे आज जरी ते स्वतंत्र लढू म्हणाले असतील, तरी उद्या ते विचार बदलतील, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. तसेच मिलिंद एकबोटेंच्या अटकेसंदर्भात मी सत्तेत असलो तरी माझ्याकडे गृहखातं नाही. मात्र यातील दोषींवर कारवाई करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यावेळी दगडफेक करणाऱ्यांना अटक केली आहे आणि इतर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचंही आठवलेंनी म्हटलं आहे.

COMMENTS