मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नसल्याचं रामदास आठवलेंचं वक्तव्य!

मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नसल्याचं रामदास आठवलेंचं वक्तव्य!

रायगड – मराठा आरक्षण हे न्यायालयात टिकणार नसल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच देशात मंदिर, पुतळे बांधले नाहीत तर मते मिळणार नसल्याचंही यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे. खोपोली येथे एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

दरम्यान मराठा आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. देशात 75 टक्के आरक्षणाचा कायदा केल्यास आरक्षणाचा मुद्दा सुटणार आहे. आमचा मराठा आरक्षणाला पाठींबा आहे परंतु ते न्यायालयात टिकणार नसल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच राम मंदिर होणे ही करोडो लोकांची इच्छा आहे व आमचीही आहे. मात्र वादग्रस्त जागेचा निकाल लागेपर्यंत थांबणे गरजेचे आहे. राममंदिर बांधताना मुस्लिम समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे आहे.  राम मंदिराची जागा ही बौद्ध धर्मियांची असून तेथे बुद्धविहार होते. मात्र सध्या वादग्रस्त जागा असल्याने त्या बदल्यात बौद्ध धर्मियांना दुसरीकडे जागा शासनाने द्यावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

COMMENTS