सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेवर  राजू शेट्टी म्हणाले…

सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेवर राजू शेट्टी म्हणाले…

कोल्हापूर – हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. 2 लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्जमाफ करणार असल्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली आहे. 2 लाखापर्यंत संपूर्ण कर्जमाफी असेल. शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळवण्यासाठी खेटे घालावे लागणार नाहीत. त्यांना अधिकाधिक, लवकर आणि योजनेचा सर्व फायदा मिळेल याची काळजी सरकार घेईल. 30 सप्टेंबर 2019 पासून शेतकऱ्यांची कर्जमाफी लागू होणार, असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान सरकारच्या या घोषणेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु, सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे सातबारा कोरा झाल्याचे दिसत नसल्याचं राजू शेट्टींनी यांनी म्हटलं आहे. या कर्जमाफीमुळे प्रत्यक्षात नुकसान झालेल्यांना लाभ नाही. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा नाही, दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं असल्याचं शेट्टी म्हणाले आहेत.

COMMENTS