…तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार – राजू शेट्टी

…तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार – राजू शेट्टी

मुंबई – अमरावती जिल्ह्यातील लोणी येथे काल दुष्काळ पाणी परिषद पार पडली. या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील उपस्थित होते.यावेळी राजू शट्टी यांनी सरकारला इशारा दिला आहे.
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या वाळलेल्या बागेचे आठ दिवसात तातडीने पंचनामे करावे व वाळलेल्या संत्रा बागेला एक लाख रुपये तसेच टँकरने पाणी घालून जगविलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यास एकरी ५० हजार रूपये तातडीची मदत करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. तसेच या मागण्या मान्य न केल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळ तीव्र आहे. त्याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कुठे चारा छावणींना अनुदान नाही तर कुठे जनावरांसाठी चारा, पाणी उपलब्ध नाही. लोकसभा विजयाच्या धुंदीत राज्यकर्त्यांना दुष्काळग्रस्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही. दुष्काळी मदतीसाठीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या दबावाला शेतकरी संघटना बळी पडणार नसून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली.

तसेच जलयुक्त शिवार योजनेमध्ये वरूड तालुक्यात ५०० कोटी रूपये खर्चूनही कूपनलिकेला १२०० फुटापर्यंत पाणी लागलं नाही मग इतका पैसा खर्च करूनही हे पाणी मुरले कुठे ?यामुळे यामध्ये झालेल्या भ्रष्ट्राचाराची निवृत्त अभियंता व सुशिक्षीत बेरोजगार अभियंतामार्फत चौकशी करण्याची मागणीही शेट्टी यांनी केली आहे.

COMMENTS