राज्य शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही दुकानं सुरु होणार नाहीत – राजेश टोपे

राज्य शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही दुकानं सुरु होणार नाहीत – राजेश टोपे

मुंबई – काही दुकानांना आणि व्यवहारांना केंद्र सरकारने संमती दिली आहे. परंतु ३ मेपर्यंत महाराष्ट्रात कोणतीही दुकानं सुरु होणार नाहीत असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. काल रात्री केंद्राने काही निर्णय घेतले आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, जोपर्यंत राज्य शासन यामध्ये निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात असलेली दुकानं सुरु करण्याचा काही प्रश्नच येत नाही असं टोपे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाउन जसा आहेत तसाच सुरु राहणार आहे.

दरम्यान २७ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आहे. त्यावेळी काही वेगळा निर्णय घेतला गेला तर तो माननीय मुख्यमंत्री सांगतील असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ३ मेपर्यंत लॉकडाउन जसा आहेत तसाच राहणार आहे. तसेच राज्यात 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून येत आहेत. मात्र, अद्याप तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचंही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

COMMENTS