मध्य प्रदेशनंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचाही तिढा सुटला, राहुल गांधींंनी यांना दिली संधी !

मध्य प्रदेशनंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचाही तिढा सुटला, राहुल गांधींंनी यांना दिली संधी !

नवी दिल्ली – मध्य प्रदेशनंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचाही तिढा सुटला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनुभवी अशोक गेहलोत यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपदावर सचिन पायलट यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तरुण नेतृत्वाला संधी देतील असे वाटत होते. पण मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानमध्येही काँग्रेसने अनुभवाला पसंती देत अशोक गेहलोत यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. अशोक गेहलोत यांनी यापूर्वी दोन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. सचिन पायलट राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

o

दरम्यान मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये चुरस पहायला मिळाली होती. सचिन पायलट यांनी पक्ष बांधणीसाठी प्रचंड मेहनत घेतली व राजस्थानात काँग्रेसचे सरकार आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. राजस्थानमध्ये पाच वर्ष प्रचंड मेहनत केली. त्यामुळे न्याय मिळाला पाहिजे असंही सचिन पायलट यांनी म्हटलं होतं. परंतु राहुल गांधी यांनी त्यांची समजूत काढत पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावर संधी दिली आहे.येत्या १७ डिसेंबरला सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी माहिती अशोक गेहलोत यांनी दिली आहे.

COMMENTS