मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया!

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया!

नवी दिल्ली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची आज भेट घेतली. ईव्हीएमवर संशय असून यापुढील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. मॅच फिक्स असेल तर तयारी करण्याला काय अर्थ ? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. तरीही मी त्यांना ईव्हीएम संदर्भात निवेदन दिले . यात मी बॅलेट पेपरची मागणी केली आहे. ईव्हीएमची चीप अमेरिकेहून मागविली जाते , अशी माहिती आयोगाने दिली . यावरून चिपमध्ये हॅकिंगची शक्यता आहे . मोदी सरकार सत्तेत येण्याअगोदर भाजपा या ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवत होता. मात्र २०१४ नंतर त्यांनी हा विषयच सोडून दिला असाही आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

देशात ईव्हीएमबाबत आवाज ही प्रत्येकाच्या मनात शंका आहे. जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. मतदारांमध्ये आपण कुणाला मतदान केले याबाबतही शंका असून ईव्हीएम घोळ झाला असल्याचे प्रत्येकालाच वाटते . या पार्श्वभूमीवरच मी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ईव्हीएममधील चिप कुठून येते असं विचारलं असता, अमेरिकेतून येत असल्याचं उत्तर मिळालं. या मशिनमध्ये परदेशी हात असेल तर विश्वास कसा असेल? निवडणूक होतेय की गणिताची आकडेमोड होते? ज्या देशात दोन महिने निवडणुका होतात, तिथे दोन दिवस मतमोजणी झाली तर काय फरक पडणार असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS