मोदी सरकारनं मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला, राहुल गांधी यांचा आरोप !

मोदी सरकारनं मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला, राहुल गांधी यांचा आरोप !

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राफेल व्यवहारात मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच भ्रष्टाचार, रोजगार आणि राफेल प्रश्नांवर बोलताना मोदी नजरेला नरज भिडवण्यास घाबरत असल्याचेही राहुल गांधी यांनी जयपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिनिधी संमेलनात म्हटलं आहे.

दरम्यान युपीए सरकारच्या काळात सरकारने एक विमान ५४० कोटी रुपयांत विकत घेतले होते. मात्र, सध्या भाजपा सरकारने त्याच एका विमानाच्या खरेदीसाठी फ्रान्सच्या कंपनीला १६०० कोटी रुपये दिले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच हा मोठा घोटाळा असून पंतप्रधान या प्रकरणावर बोलायला तयार नसल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली गेली. गेल्या २ वर्षांत मोदी सरकारने १५ उद्योगपतींचे २ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मात्र, आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर पंतप्रधान मोदींच्या तोंडून एकही शब्द निघत नसल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS