मी निवडणुकीसाठी प्रचाराच्या जोशात ‘ते’ बोलून गेलो, राहुल गांधींचा माफीनामा!

मी निवडणुकीसाठी प्रचाराच्या जोशात ‘ते’ बोलून गेलो, राहुल गांधींचा माफीनामा!

नवी दिल्ली – मी निवडणुकीसाठी प्रचाराच्या जोशात
‘चौकीदार चोर है’ असे बोलून गेलो असल्याचा खेद काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या राफेल व्यवहाराबाबतच्या निर्देशावर भाष्य करताना व्यक्त केलेले मत प्रचाराच्या जोशात केले होते असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. आज सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

दरम्यान राफेल व्यवहाराबाबत गहाळ झालेली काही कागदपत्रे प्रसार माध्यमांत प्रसारित झाल्यावर सुप्रीम कोर्टाने ती ग्राह्य धरण्याचे निर्देश दिले होते. सुप्रीम कोर्टाचे हे निर्देश ‘चौकीदार चोर है’ हे मान्य करणारे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना केला होता. त्यावर भाजपने आक्षेप घेतला होता.

त्यानंतर याबाबत सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर 27 पानी प्रतिज्ञापत्रात राहुल गांधी यांनी मी पंतप्रधानांना चोर म्हणालो नाही, ‘चौकीदार चोर है’ ही आमची राजकीय घोषणा आहे. निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात मी कोर्टाच्या निर्देशांबाबत बोलताना चुकीचे विधान केले असल्याचं म्हटलं आहे.

COMMENTS