राफेल कराराची महत्त्वाची फाईल मनोहर पर्रिकरांकडे, काँग्रेसनं जारी केलेल्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपमुळे खळबळ !

राफेल कराराची महत्त्वाची फाईल मनोहर पर्रिकरांकडे, काँग्रेसनं जारी केलेल्या ‘त्या’ ऑडिओ क्लिपमुळे खळबळ !

नवी दिल्ली – राफेल करारावरुन काँग्रेसनं पुन्हा  भाजपवर टीका केली आहे. या कराराबातची महत्त्वाची फाईल माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे असल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे.याबाबतची एक ऑडिओ क्लिप काँग्रेसनं जारी केली असून या ऑडिओ क्लिपमध्ये गोव्यातील भाजपचे मंत्री विश्वजीत राणे यांनी एक मोठा खुलासा केला असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

दरम्यान या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असल्याचं दिसत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे मंत्री म्हणत आहेत की मनोहर पर्रिकरांकडे राफेलची महत्त्वाची माहिती आहे. मग राफेल कराराचं कोणतं रहस्य पर्रिकरांकडे आहे? सरकार राफेलच्या जेपीसी चौकशीला का घाबरत आहे?’ असा सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केले आहे.

काल एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच राफेल कराराबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “सैन्याला दुर्बल करून माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले. मला जितक्या शिव्या द्यायच्या त्या द्या, जे आरोप करायचे ते करा, पण जवानांना त्यांच्या नशिबावर सोडणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी निर्णय घेणारच,असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच संसदेत राफेल करारबाबत मी विस्तृतपणे सांगितलं आहे.

सुप्रीम कोर्टानेही या राफेल कराराबाबत याचिकाच फेटाळून लावली आहे. फ्रान्सच्या पंतप्रधानांनीही याबद्दल खुलासा केला आहे. पण तरीही त्यांच्याकडून वारंवार आरोप होतं आहे. नुसतं दगड मारून ते पळून जात आहे. पण, त्यांनी जे आरोप केले आहे, त्यांनी सिद्ध करून दाखवावे”, असं आव्हानही मोदींनी राहुल गांधी यांना केलं आहे.

COMMENTS