कोणत्या पक्षात जाणार ?, राधाकृष्ण विखे पाटलांचं स्पष्टीकरण !

कोणत्या पक्षात जाणार ?, राधाकृष्ण विखे पाटलांचं स्पष्टीकरण !

अहमदनगर – विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच लोणी येथे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेस सोडण्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणूक झाल्यानंतर कार्यकत्यांची बैठक घेणार असून राज्यातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. त्यानंतर आपली राजकीय भूमिका ठरवणार असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  विधिमंडळ पक्षाचा नेता असूनही पक्ष माझ्या मागे उभा राहिला नाही. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत मैत्रीची अफवा उठवली, मात्र त्यांचा मी व्यक्तिगत फायदा कधीच घेतला नाही असंही विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच विखे पाटील हे भाजप किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. परंतु याबाबतची भूमिका निवडणूक झाल्यानंतर कार्यकत्यांची बैठक घेणार, राज्यातील कार्यकर्त्यांशी बोलणार, त्यानंतर आपली राजकीय भूमिका ठरवणार असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS