राज ठाकरेंच्या घरासमोर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न !

राज ठाकरेंच्या घरासमोर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न !

मुंबई  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर एका शिक्षकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत गीते असं या प्राध्यापकाचं नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणा-या शिक्षकाला उपचारांसाठी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रहेजा कॉलेजने आपल्यावर अन्याय केला असल्याचा आरोप या शिक्षकाने केला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपले आवडते नेते असून त्यांना कलेविषयी जाण आहे. त्यामुळे राज यांच्यामार्फत आपल्या लढ्याला आवाज मिळेल, या उद्देशाने त्यांच्या घराबाहेर आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी या शिक्षकाने लिहिली आहे.

दरम्यान संबंधित शिक्षक हा रहेजा कॉलेजमध्ये कला विषयाचा शिक्षक आहे. परंतु कॉलेज प्रशासन हे विभाग बंद करत आहे. कला विभागासाठी मागील चार वर्षांपासून आपला लढा सुरु आहे परंतु याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही कोणताही उपयोग झाला नाही. त्यामुळे आपण आत्महत्या करण्याचं ठरवलं असल्याचं या शिक्षकानं म्हटलं आहे. यावेळी राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोलिस तसंच त्याचे कुटुंबीयही उपस्थित होते.

COMMENTS