राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार, फडणवीसांच्या आरोपानंतर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया!  पाहा

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार, फडणवीसांच्या आरोपानंतर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया! पाहा

मुंबई – राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून याची चौकशी करण्याची मागणीही फडणवीस यांनी केली आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली हा भ्रष्टाचार केला जात असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान केंद्र सरकारची राष्ट्रीय आरोग्य मिशन ही योजना असून केंद्राच्या निधीतून पण राज्य सरकारमार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे राज्य सरकारमार्फतच उमेदवारांच्या नियुक्त्या केल्या जातात. कंत्राटी तत्त्वावर काम करणार्यांना सेवेत कायम नियुक्त्या देण्यासाठी उमेदवारांकडून १ ते २.५० लाख रूपये घेतले जात आहेत. जवळपास 20 हजार उमेदवारांकडून सुमारे ३०० ते ४०० कोटी रूपयांचे जमा होत आहेत. हे सारे कुणाच्या आशीर्वादाने होत आहे, याचीही सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फडणवीस यांनी केलेल्या आरोपांनंतर विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.पाहा काय म्हणाले प्रवीण दरेकर..

 

COMMENTS