देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीवर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया !

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीवर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया !

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली असल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नसल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS