प्रताप सरनाईकांची ईडीकडून तब्बल सहा तास चौकशी

प्रताप सरनाईकांची ईडीकडून तब्बल सहा तास चौकशी

मुंबई : टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेनुसार ते ईडीच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता  हजर झाले. यावेळी त्यांची सतत सहा तास चौकशी चालली. ही चौकशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालली. या चौकशीत त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. ईडीने चौकशी पूर्ण केल्यानंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यानंतरही आपण चौकशीला तयार असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत ईडीने २४ नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांचे घर, कार्यालय आणि हॉटेलसह विविध १० ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक भारताबाहेर होते. गुरुवारी प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरु केली. यावेळी त्यांनी टॉप्स सेक्यूरिटीच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत विचारण्यात आलं. तसेच, त्यांना कौटूंबिक माहितीही विचारण्यात आली. तुमच्या कुटुंबात कोण-कोण आहेत?, ते काय करतात?, असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. तसेच, त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाबाबतही सरनाईक यांना विचारण्यात आल्याची माहिती आहे.

 

COMMENTS