निवडणूक तज्ञ प्रशांत किशोर यांच्या टीमसोबत मातोश्रीवर खलबतं !

निवडणूक तज्ञ प्रशांत किशोर यांच्या टीमसोबत मातोश्रीवर खलबतं !

मुंबई – निवडणूक तज्ञ प्रशांत किशोर यांच्या टीमसोबत मातोश्रीवर खलबतं सुरु झाली असल्याची माहिती आहे.
प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय प्रशांत किशोर टीम आणि शिवसेना पदाधिकारी यांच्यात बैठक सुरु आहे.
आज शिरूर, शिर्डी, मावळ आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचा प्रशांत किशोर यांच्या टीमकडून घेतला जात आहे.

दरम्यान प्रचार रणनिती ठरवण्याबरोबरच प्रत्येक मतदार संघातील बलस्थानं, कमतरता यावर या बैठकीत चर्चा केली जात असून बैठकीला राज्यमंत्री दादा भुसे, अनिल देसाई, खासदार श्रीरंग बारणेसह या मतदारसंघातील शिवससेनेचे आमदार, पदाधिकारी उपस्थित आहेत.

मागील म्हणजेच 2014 मधील लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपची रणनिती आखली होती. त्यामुळे देशात भाजपचा मोठा विजय झाला होता. त्यानंतर आगामी निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांची टीम शिवसेनेसाठी रणनिती आखत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS