मराठा आरक्षणाला विरोध नाही परंतु एकाच्या ताटातून काढून दुसय्राला देऊ नका – प्रकाश शेंडगे

मराठा आरक्षणाला विरोध नाही परंतु एकाच्या ताटातून काढून दुसय्राला देऊ नका – प्रकाश शेंडगे

मुंबई – आरक्षणावरुन ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समितीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या जात आहेत. परंतु ओबीसींना मात्र डावललं जात आहे. मराठा समाज म्हणजे मोठा भाऊ आणि ओबीसी समाज म्हणजे छोटा भाऊ आहे. मोठ्या भावाला तुम्ही मागल ते देत आहात परंतु छोट्या भावाला साधी शिळी भाकरही देत नाहीत अशी टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सरकारवर केली आहे.

सारथी संघटना भ्रष्टाचारामुळे बंद पडली होती ती तुम्ही चालू केली, मग आमच्यासाठी काय केलं? असा सवालही प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही परंतु एकाच्या ताटातून काढून दुसय्राला देऊ नका असंही प्रकाश शेंडगे म्हणाले आहेत.

 

COMMENTS