प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का, मागितला हा खुलासा !

प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का, मागितला हा खुलासा !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबोडकर यांच्या वंचित बहूजन आघाडीला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सहभागी करुन घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. परंतु अशात प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. प्रकाश आंबेडकरांनी आज आपली भूमिका जाहीर करत काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेस फक्त चर्चेचा प्रस्ताव देते चर्चा मात्र करत नाही. त्यामुळे चर्चा करायची की नाही हे त्यांनी आधी ठरवावं तसेच काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. त्यावरही आंबेडकरांनी काँग्रेसनं खुलासा करावा, जोपर्यंत काँग्रेस खुलासा आणि पुरावे देत नाहीत तोपर्यंत चर्चा करणार नसल्याची भूमिका आंबेडकर यांनी घेतली आहे.

दरम्यान यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी 40 जागांचा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. तसेच आता आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा खुलासाही करण्याची अट समोर ठेवली आहे. त्यामुळे या दोन्ही अटी काँग्रेस मान्य करण्याची शक्यता नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा वंचित बहूजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS