अशोक चव्हाणांच्या खुल्या ऑफरवर काय म्हणतात प्रकाश आंबेडकर ?

अशोक चव्हाणांच्या खुल्या ऑफरवर काय म्हणतात प्रकाश आंबेडकर ?

मुंबई – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबडेकरांना आघाडीत येण्यासाठी खुली ऑफर दिली आहे. याबाबत आता प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत आमचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. काँग्रेसच्या ऑफरवर आम्ही आमच्या पक्षाच्या बैठकीत विचारमंथन करू. त्यानंतर आमची या आघाडीबाबतची भूमिका जाहीर करू. पण आम्ही आमचा फायदा असणाराच निर्णय घेऊ,’ असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपूर्वी आम्ही ऑफर दिली होती. पण काँग्रेसकडून सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. तुम्ही सलग तीन निवडणुकांत हरलेल्या 12 जागा आम्हाला द्या, असं आम्ही त्यांना म्हटलं होतं. परंतु काँग्रेसनं अनुकुलता दाखवली नाही. त्यानंतर निवडणुकीत आणि आता निवडणुकीनंतर काँग्रेसकडून आमच्यावर भाजपची बी टीम असा आरोप होत आहे. त्यामुळे आमच्या आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. काँग्रेसने या आरोपाबाबत एकदा आपली भूमिका जाहीर करावी,’ असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला असला तरीही या आघाडीने अनेक जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचं नुकसान केल्याचं पाहायला मिळालं असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS