शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचं निधन !

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचं निधन !

रायगड – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचं आज निधन झालं आहे. मुंबईत आज सकाळी त्यांचं निधन झालं असून वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाड विधानसभा मतदारसंघातून ते 3 वेळा निवडून आले होते. युती सरकारच्या काळात 1995 मध्ये त्यांनी गृहराज्यमंत्री पद सांभाळले होते. तसेच ग्रामविकास खात्याचे मंत्रिपद आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या निधनामुळे कोकणासह राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अमित मोरे, पत्नी, मुलगी नातंवडे असा मोठा परिवार आहे.

प्रभाकर मोरे यांनी आपल्या काळात महाडचा मोठा कायापालट केला होता. रस्ते , पूल, पाणी योजना, डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक अशा कामांसह महाड अतिरिक्त एमआयडीसी  निर्माण करून त्यांनी स्थानिक तरुणांना रोजगार निर्मितीसाठी भरीव कामगिरी केली होती. त्यांच्या आकस्मित जाण्याने महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा मार्गदर्शक नेता हरपला असल्याचं महाडचे आमदार भारत  गोगावले  यांनी म्हटलं आहे.

COMMENTS