त्यामुळेच शरद पवारांनी साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास नकार दिला – पंतप्रधान मोदी

त्यामुळेच शरद पवारांनी साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास नकार दिला – पंतप्रधान मोदी

सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान मोदी यांची सभा साताय्रात पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला लक्ष्य केले. शरद पवार यांना हवेचा रोख ओळखता येतो. त्यामुळेच साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास त्यांनी नकार दिला, असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. या सभेत मोदींनी उदयनराजे भोसले यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिक्षा दिली. आता विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीला यापेक्षा मोठा फटका बसेल असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सध्याची परिस्थिती बिकट आहे. जे लोक साताऱ्याला बालेकिल्ला समजत होते, ते आता लढायची हिंमतही करत नाहीत. शरद पवार राजकारणातील कसलेला खेळाडू आहे. ते वारा कोणत्या दिशेला वाहत आहे, हे अचूक ओळखतात. त्यामुळेच शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उतरण्यास नकार दिला असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

COMMENTS