देशभरात 90 लाखापेक्षा जास्त बेड,  12 हजार क्वारंटाईन सेंटर तर 2 हजार लॅब टेस्टिंगचं काम सुरु – पंतप्रधान मोदी

देशभरात 90 लाखापेक्षा जास्त बेड, 12 हजार क्वारंटाईन सेंटर तर 2 हजार लॅब टेस्टिंगचं काम सुरु – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. अनेक युरोपीय देशांमध्ये कोरोनाची आकडेवारी कमी होता-होता चिंताजनक पद्धतीने वाढली आहे. अमेरिका-ब्राझिलमध्ये आकडा मोठा वाढला आहे. मृत्यू दर इतर देशात जास्त आहे.
भारतानं जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवला.
भारताचा रिकव्हरी रेट चांगला आहे. देशातून लॉकडाऊन गेला असला तरी व्हायरस गेलेला नाही. त्यामुळे अजूनही सतर्कता बाळगा लस येईपर्यंत ढिलाई नको, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

दरम्यान आपल्या देशभरात 90 लाखापेक्षा जास्त बेड आपल्याकडे उपलब्ध आहेत. 12 हजार क्वारंटाईन सेंटर आहेत. तर 2 हजार लॅब टेस्टिंगचं काम सुरु आहे. कोरोनाचं संकट गेलं असं म्हणण्याची वेळ नाही. विना मास्क तुम्ही कुटुंबाला संकटात टाकत आहात. आपल्या देशाचे शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत.
आपल्या काही व्हॅक्सिन चाचणीच्या पुढच्या टप्प्यात आहेत. प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा प्रयत्न असून सरकारची त्यासाठी पूर्ण तयारी असल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

COMMENTS