पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली विजयसिंह मोहिते पाटलांची स्तुती !

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली विजयसिंह मोहिते पाटलांची स्तुती !

माढा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज  माढा मतदारसंघातील अकलूज येथे पार पडली. यावेळी
राम राम मंडळी, अकलूजकरांनो कसे आहात, पंढरपूरचे दैवत विठ्ठल-रुक्मिणी, अक्कलकोट स्वामी समर्थ, सिद्धेश्वर महाराज, अहिल्यादेवी होळकर यांच्या धरतीला मी वंदन करतो,या शब्दात मराठी भाषेत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसेच यावळी मोदींनी विजयसिंह मोहिते पाटलांची स्तुती केली. राजकीय जीवनातली 50 वर्ष ही फार मोठी असतात. विजयसिंह मोहिते पाटील यांची 50 वर्षाची कारकीर्द आहे. अशा विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य आहे,  मी स्वतःला भाग्यशाली मानतो. सार्वजनिक जीवनात त्यांनी कुठल्याही पक्षात काम केलेलं असो, त्यांचं काम मोठे आहे. त्यांना उत्तम स्वास्थ्य आणि दिर्घआयु लाभो आणि त्यांना  देश आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची आणखी शक्ती लाभो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची स्तुती करत सत्कार केला.

दरम्यान जे दिल्लीत बसले आहेत, त्यांना जमिनीवरील सत्य माहिती नाही. ही गर्दी त्या लोकांनी पाहावी, मग त्यांच्या लक्षात सत्य स्थिती येईल. मला आता लक्षात आलं की शरदराव यांनी मैदान का सोडलं. ते मोठे खेळाडू आहेत. ते वेळेआधी हवेचं रूप ओळखतात. दुसरं कुणी बळी गेलं तरी चालेल पण ते आपल्या परिवाराचं आणि आपलं नुकसान कधी होऊन देत नाहीत. त्यामुळेच ते मैदान सोडून पळाले असल्याची टीकाही यावेळी मोदींनी केली.

COMMENTS