मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पहिली, तर अजित पवारांना दुसरी पसंती, सरकारनामा आणि साम टीव्हीच्या सर्व्हेक्षणातील अंदाज !

मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पहिली, तर अजित पवारांना दुसरी पसंती, सरकारनामा आणि साम टीव्हीच्या सर्व्हेक्षणातील अंदाज !

मुंबई – सरकारनामा आणि साम टीव्ही यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात मुख्यमंत्री म्हणून 2019 मध्ये सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. फडणवीस यांना 20 टक्के मतदारांनी पसंती दर्शविली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. अजित पवार यांना 16 टक्के मतदारांनी पसंती दर्शविली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. दोन्ही नेत्यांना 13 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना 12 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. तर नितीन गडकरी आणि सुप्रिया सुळे यांना प्रत्येकी 10 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही 5 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. तर नारायण राणे यांना केवळ 1 टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शविला आहे.

पक्ष म्हणून भाजपनचं बाजी मारली आहे. तब्बल 28 टक्के मतदांनी भाजप सरकार पुन्हा सत्तेवर यावे असं मत व्यक्त केलं आहे. 24 टक्के मतदारांना काँग्रेस, 21 टक्के मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर 20 टक्के मतदारांनी शिवसेना सत्तेवर यावी असं म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली तर भाजप शिवसेनेची दाणादाण उडेल असंही सर्व्हेमध्ये पुढं आलं आहे.

COMMENTS