देशद्रोह प्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा !

देशद्रोह प्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा !

नवी दिल्ली – देशद्रोह प्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. लाहोर उच्च न्यायालयाने सरकारला सोमवारी नोटीस पाठवली होती. मुशर्रफ यांनी त्यांची याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांच्याविरुद्धचा खटला आणि इतर कारवाई असवैधानिक असल्याचं जाहीर करावं अशी मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने इस्लामाबादच्या विशेष न्यायालायत झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला आहे.

दरम्यान मुशर्रफ सध्या संयुक्त अरब अमिरातीतील दुबई इथे राहात आहेत. सध्या 76 वर्षांचे असलेले मुशर्रफ दुबईत उपचार घेत आहेत.
संविधानाचा भंग केल्या प्रकरणी आणि 2007 मध्ये आणीबाणी लागू केल्या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. तब्येतीचे कारण देत त्यांनी पाकिस्तानात परतण्यास नकार दिला होता. मुशर्रफ यांच्याविरोधातील राष्ट्रद्रोहाचा हा खटला 2013 पासून रखडला होता.

COMMENTS