शेतक-यांना वेगळं आरक्षण द्या, शरद पवार करणार केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी !

शेतक-यांना वेगळं आरक्षण द्या, शरद पवार करणार केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी !

मुंबई – शेतक-यांना वेगळं आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. एससी, एसटी ओबीसी या घटकांना कायद्याने आरक्षण मिळाले आहे त्यांना धक्का लावता कामा नये परंतु बाकीच्या घटकांना आर्थिकदृष्टय़ा आरक्षण दिले पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. एससी, एसटी ओबीसीसोडून जे आर्थिकदृषट्य़ा मागास आहेत त्यांना हा निकष लावला पाहिजे असे माझे मत होते. तसेच काही घटकांनी मला सूचना केली आणखी एक वर्ग घ्यावा, तो वर्ग म्हणजे शेतकरी वर्ग. एससी, एसटी, ओबीसी शेतकरी असतील तर त्यांना आरक्षण मिळेलच, पण त्याशिवाय जे शेतकरी असतील त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे, कारण शेतीपासून लोक लांब जातायत, शेती शाश्वत नाही त्यामुळे शेतक-यांसाठी आरक्षण देण्याची मागणी केंद्र आ़णि राज्य सरकारकडे करणार असल्याचं पवार यांनी म्हटल आहे.

दरम्या आरक्षणाबाबत माझी मतं राज्यातील जाणकार लोकांना माहीत असावीत. १९९२ साली मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयावेळी राज्याची सूत्र माझ्या हाती होती देशात पहिल्यांदा मंडल आयोगाची अंमलबजावणी आपल्या राज्यात केली गेली. महिलांना आरक्षण देण्याबाबत निर्णय झाला तेव्हाही राज्याची सूत्र माझ्या हाती होती. तसेच मराठा मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता, मात्र ते आरक्षण न्यायालयात टिकले नाही असंही पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS